सुरेश रैनाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया; इतक्या दिवसांसाठी राहणार क्रिकेटपासून लांब

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सुरेश रैनाच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर शुक्रवारी अँमस्टरडॅम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट मोसमातील सुरुवातीच्या काही आठवड्यांना मुकावे लागणार आहे.

त्याला मागील काही दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यातून त्याला बरे होण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ लागणार आहे.

याबद्दल बीसीसीआयने ट्विट करुन माहिती दिली आहे.

रैनावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर एच व्हॅन डेर होवेन म्हणाले, ‘सुरेश रैनाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्याला मागील काही महिन्यांपासून या दुखापतीचा त्रास होत होता. त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून यातून बरे होण्यासाठी त्याला 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.’

रैनाने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत भारताकडून 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी20 सामने असे मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 322 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 32.87 च्या सरासरीने 7988 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 62 विकेट्स घेतल्या आहेत.

रैनाला त्याच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी लवकर बरा हो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: विजय शंकरचे दुखापतीनंतर धमाकेदार पुनरागमन; पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट

भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या ठिकाणात बदल; पुण्यात होणार हा सामना

लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे १२ जणांचा इंग्लंड संघ