सुरिंदर नाडा जाणार अनुप कुमार, राहुल चौधरीच्या या कर्णधारांच्या यादीत

प्रो कबड्डीमध्ये काल हरयाणा स्टीलर्स आणि तमील थालयइवाज यांचा सामना २५-२५ असा बरोबरीत सुटला. याच बरोबर प्रो कबड्डीमध्ये खेळलेल्या सर्व संघ बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा भाग बनले आहेत. तमील थालयइवा, यु.पी.योद्धा, हरयाणा स्टीलर्स आणि गुजरात फॉरचूनजायन्टस या सर्व नवीन संघाचे सामने बरोबरीत सुटले आहेत.

या मोसमात हरियाणा स्टीलर्स संघाने २ सामने बरोबरीत सोडवले आहेत. एका मोसमात सर्वाधिक ३ सामने बरोबरीत सुटले आहेत. पहिल्या मोसमात यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स या दोन संघानी प्रत्येकी सामने बरोबरीत सोडवले होते. दुसऱ्या मोसमात देखील तेलुगू टायटन्सने ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत. या मोसमात जर हरयाणा संघाने आणखी एक सामना बरोबरीत सोडवला तर हरियाणा संघ यु.मुंबा आणि तेलुगू टायटन्सच्या विक्रमाची बरोबरी करेल.

सुरिंदर नाडाच्या हरयाणा स्टीलर्सने जर आणखी एक सामना बरोबरीत सोडवला तर सुरिंदर हा अनुप कुमार, राहुल चौधरी या कर्णधारांच्या नंतर एका मोसमात तीन सामने बरोबरीत सोडवणारा तिसरा कर्णधार बनेल.

प्रो कबड्डीच्या इतिहासात आज पर्यंत १९ सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यातील १३ सामने हे ऑगस्ट या महिन्यातच बरोबरीत सुटले आहेत.