3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत श्रीवास्तन सूर्यकुमार, आकाश अहलावत, आदित्य बलसेकर यांची आगेकूच

मुंबई। प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात श्रीवास्तन सूर्यकुमार, आकाश अहलावत, आदित्य बलसेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या रत्नाकर बँक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पहिल्या पात्रता फेरीत श्रीवास्तन सूर्यकुमारने ऋषभ गुंदेचाचा 5-7, 6-2, 11-9 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. चुरशीच्या झालेल्या लढतीत आकाश अहलावत याने मनवीर सिंग रंधावाचा 6-4, 1-6, 10-7 असा पराभव केला. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना बुधवार, 24 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

पहिली पात्रता फेरी: पुरुष गट:

धार्मिल शहा(भारत)वि.वि.संदीप कोत्तरकोंडा(भारत)6-4, 7-6(5);

प्रियांक गंगाधरण(भारत)वि.वि.सौमील साकरिया(भारत) 6-1, 6-0;

राघव जयसिंघानी(भारत)वि.वि.राऊ पारकर(भारत)6-1, 6-2;

श्रीवास्तन सूर्यकुमार(भारत)वि.वि.ऋषभ गुंदेचा(भारत) 5-7, 6-2, 11-9;

द्रोणा वालिया(भारत)वि.वि.जिनो थॉमस 6-0, 6-1;

आदित्य कोडकल्ला(भारत)वि.वि.अभिषेक कोनार(भारत)7-6(2), 6-0;

गॅरी टोकस(भारत)वि.वि.प्रशांत सावंत(भारत)6-1, 6-2;

धवल जैन(भारत)वि.वि.तुषार शर्मा(भारत) 6-1, 6-0;

आकाश अहलावत(भारत)वि.वि.मनवीर सिंग रंधावा(भारत)6-4, 1-6, 10-7;

आदित्य बलसेकर(भारत)वि.वि.क्षितिज कमल(भारत) 6-2, 6-2;

वाशू गुप्ता(भारत)वि.वि.गौतम काळे(भारत)6-0, 6-2;

रोहीन गजरी(भारत)वि.वि.रोहन तैनवाला(भारत) 6-1, 6-1.