अखेर केएल राहुल, हार्दिक पंड्याला परतावे लागणार मायदेशी, कॉफी विथ करन प्रकरण अंगलट

भारतीय  संघातील क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी कॉफी विथ करन या शोमध्ये विवादात्मक विधाने केली होती. यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

हे दोघेही सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीने (सीओए) त्यांना भारतात चौकशीसाठी बोलावले आहे.

तसेच या समीतीने त्यांच्यावर निलंबणाची कारवाई केली आहे. हे निलंबन किती दिवस असणार आहे, हे अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे या दोघांनाही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेला मुकाव लागण्याची शक्यता आहे.

सीओएने त्यांना निलंबनाचे पत्र लिहून याबद्दल कळवले आहे. त्यांनी यात सांगितले आहे की ‘चौकशी पूर्ण होईपर्यंत ते आयसीसी, बीसीसीआय किंवा देशांतर्गत क्रिकेट सामने खेळू शकणार नाहीत.’

सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले आहे की, ‘पंड्या आणि राहुल या दोघांनाही चौकशी होईपर्यंत निंलबित करण्यात आले आहे.’

तसेच बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकारीने सांगितले की ‘या दोघांनाही मायदेशी परतावे लागणार आहे. त्यांनी जर उद्या तिकीट बुक केले तर तर उद्याच भारतात परतण्यासाठी रवाना होतील आणि परवा पोहचतील. सध्याची परिस्थिती पाहता त्यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठीही मुकावे लागू शकते.’

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहली, रवी शास्त्रींसाठी ही आहे आनंदाची बातमी

विराटने सांगितल्या निवृत्तीनंतरच्या योजना, ही आवडती गोष्ट तर बिलकूल नाही करणार!

केएल राहुल, हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढल्या, मायदेशी परतण्याचे आदेश…