भारताच्या सुयश जाधवला जर्मन स्विमिन्ग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक

भारताच्या सुयश जाधवने जर्मन स्विमिन्ग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. १००मीटर बटरफ्लाय प्रकारात सुयशला हे विजेतेपद मिळाले आहे.

६ जुलै ते ९ जुलै काळात जर्मनीमधील बर्लिन शहरात जर्मन स्विमिन्ग चॅम्पिअनशिपच आयोजन केलं गेलं आहे. १ मिनिटे आणि १६ सेकंड अशी वेळ नोंदवत सुयश हिटमध्ये पहिला आला होता. त्यांनतर झालेल्या मुख्य फेरीत दुसरा येत त्याने रौप्यपदक पटकावले.

सध्या सुयश हा सरावासाठी बेंगलोर शहरात राहत आहे. सुयशला मिळलेल्या या यशाबद्दल त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.