बाबारे! धोनीची स्टाईल काॅपी करु नकोस… दिग्गजाचा रिषभ पंतला सल्ला

भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर ट्रेंटब्रिज येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात 20 वर्षीय रिषभ पंतने कसोटीत पदार्पण केले. रिषभने आपल्या पहिल्या खेळीत 24 धावा केल्या होत्या.

रिषभने या सामन्यात 7 झेलही घेतले होते. 4 थ्या आणि 5 व्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून अतिरिक्त धावाही खूप गेल्या होत्या.  विकेटकिपींग करताना त्याच्या फुटवर्क बाबतही माजी क्रिकेटपटूंनी चिंता व्यक्त केली आहे.

रिषभला विकेटकीपींग मधील प्राथमिक गोष्टी शिकणे आवश्यक असल्याचे मत भारताचे माजी महान विकेटकीपर सईद किरमानी यांनी व्यक्त केले आहे.

”गोलंदाजाने धाव  घेतल्यानंतर दोन्ही पायांच्या चौड्यावर वाकून चेंडूचा अंदाज घेणे हे विकेटकिपींग मधील प्राथमिक कौशल्य आहे. चेंडूचा टप्पा पडेपर्यंत वाट पाहून त्यानुसार प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. एकदा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर त्याच्या स्पिन आणि बाउन्स नुसार हालचाल करावी.” असे किरमानी म्हणाले

“विकेटकिपरची क्षमता ही फिरकी गोलंदाजापुढे खऱ्या अर्थाने कळते. वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर विकेट किपरला चेंडू पकडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. काही क्षणात दोन-चार गोष्टी जुळून आणाव्या लागत असतात. तेव्हा कुठे त्याला चांगले विकेटकिपींग करता येते.” असेही मत त्यांनी व्यक्त केले.

“धोनीचे तंत्र हे खुपच वेगळे असून आताच पदार्पण करणाऱ्या रिषभने त्याची नकल करण्याचा प्रयत्न करू नये.” असेही किरमानी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-