१२ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल, गुरुकुल हिंदी मिडीयम स्कुलची आगेकूच

पुणे । ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत दुसऱ्या फेरीत सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल, गुरुकुल हिंदी मिडीयम स्कुल, इंदिरा नॅशनल स्कुल या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पहिल्या सामन्यात सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल संघाने डॉन बॉस्को हायस्कुल संघाचा टायब्रेकमध्ये 5-4 असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

निर्धारित वेळेत सामना 1-1असा बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये विजयी संघाकडून ईशान सिंग, जैंवेल सांघवी, युवराज मिलानी, आरुष कपूर यांनी गोल केले. तर, पराभूत संघाकडून श्रवण परिहार, सुजल गायकवाड यांना गोल मारण्यात अपयश आले.

दुसऱ्या चुरशीच्या झालेल्या लढतीत गुरुकुल हिंदी मिडीयम स्कुल संघाने द ऑर्चिड स्कुल संघाचा 3-2असा पराभव करून आगेकूच केली.

अन्य लढतीत इंदिरा नॅशनल स्कुल संघाने मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कुलचा 5-1असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. इंदिरा स्कुलकडून निहार कुचंकरने(16, 18मि.)दोन गोल, तर अनिरुद्ध क्षेत्री, सिद्धार्थ खंडेलवाल, सिद्धांत जैन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी:
सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल: 5(ईशांत उप्पल 21मि., ईशान सिंग, जैंवेल सांघवी, युवराज मिलानी, आरुष कपूर)(गोल चुकविले: शेरीयार मझदा)टायब्रेकरमध्ये वि.वि.डॉन बॉस्को हायस्कुल: 4(रोहित नायर 4मि., रोहित नायर, स्मित भालेराव, अॅलन पाटोळे)(गोल चुकविले: श्रवण परिहार, सुजल गायकवाड);पूर्ण वेळ: 1-1;

गुरुकुल हिंदी मिडीयम स्कुल: 3(अनमोल पांडे 8मि., अनमोल पांडे, श्रेय किशोर)(गोल चुकविले: आदित्य भट)टायब्रेकरमध्ये वि.वि.द ऑर्चिड स्कुल: 2(प्रांजल कुलकर्णी 4मि., वंकिश कुमार)(गोल चुकविले: आरव कोटकर, सोहम जाधव);पूर्ण वेळ: 1-1;

इंदिरा नॅशनल स्कुल: 5(अनिरुद्ध क्षेत्री 8मि., निहार कुचंकर 16, 18मि., सिद्धार्थ खंडेलवाल 17मि., सिद्धांत जैन 21मि.)वि.वि.मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कुल: 1(ओंकार चव्हाण 7मि.).

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ