Video: वीरेंद्र सेहवागच्या नावावर पुन्हा एकदा नकोसा असा विक्रम !

दुबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि समालोचक वीरेंद्र सेहवागच्या नावावर काल क्रिकेटमध्ये एक नकोसा असा विक्रम जमा झाला आहे. ज्या क्रिकेट प्रकारासाठी सेहवाग विशेष करून ओळखला जातो त्याच मर्यादित षटकांच्या परंतु नव्याने सुरु झालेल्या टी१० प्रकारात पहिल्याच सामन्यात तो ० धावांवर बाद झाला आहे.

३९ वर्षीय सेहवाग हा या लीगमध्ये मराठा अरेबियंस टीम संघाचा कर्णधार आहे. त्याची काल खेळाडू आणि कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सेहवाग आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

टी२० आणि टी२० मध्ये पदार्पणात बाद होणारा पहिलाच खेळाडू
२००३ मध्ये सेहवाग लेसिस्टरशायरकडून १६ जून २००३ रोजी जो टी२० सामना खेळला होता त्यातही ० धावेवर बाद झाला होता. तेव्हा यॉर्कशायरच्या क्रिस सिल्वरवुडने सेहवागला बाद केले होते.

सेहवागची विकेट घेत आफ्रिदीने साजरी केली हॅट्रिक साजरी
पख्तून्स टीमचा कर्णधार असलेल्या शाहिद आफ्रिदीने सेहवागची विकेट घेतच काल या सामन्यात आपली हॅट्रिक साजरी केली. आपल्या पहिल्याच टी१० सामन्यात हॅट्रिक घेणारा आफ्रिदी पहिलाच खेळाडू बनला आहे.