सायना नेहवालला डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद

आज (21 आॅक्टोबर) डेन्मार्क ओपनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालला तैवानच्या अग्रमानांकीत ताइ त्झू यिंग विरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

32 मिनिटाच्या झालेल्या या लढतीत ताइ त्झू यिंगने सायनाचा 13-21,21-13,6-21 असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. ताइ त्झू यिंगने पहिल्या सेटमध्येच चांगली सुरुवात करताना आघाडी घेतली होती. या सेटमध्ये सायनाने तिला लढत देण्याचा प्रयत्न केला पण तिने तिची आघाडी कायम ठेवताना हा सेट 15 मिनिटामध्ये जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये सायनाने उत्तम पुनरागमन केले. या सेटमध्ये सायनाने सुरुवातीपासून आघाडी घ्यायला सुरुवात केली. पुढे तिने ही आघाडी कायम ठेवताना हा सेट जिंकूून सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना निर्णायक सेटच्या दिशेने गेला.

निर्णायक आणि तिसऱ्या सेटमध्ये ताइ त्झू यिंगने सायनावर पूर्णपणे वर्चस्व ठेवताना तिला वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नाही. अखेर तिसरा सामना ताइ त्झू यिंगने जिंकत सामनाही जिंकला.

ताइ त्झू यिंगने सलग 11 व्यांदा सायनाचा पराभव केला आहे. सायनाने याआधी 2012 मध्ये डेन्मार्क ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. विशेष म्हणजे तिने हे विजेतेपद 21 आॅक्टोबर 2012 ला म्हणजेच 6 वर्षांपूर्वी मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

हेटमेयरच्या शतकाच्या जोरावर विंडीजचे टीम इंडियासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान

२००वा वनडे सामना खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावर झाला नकोसा विक्रम

२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून

एमएस धोनीला हा ‘कुल’ विक्रम करत सचिन, द्रविडच्या यादीत सामील होण्याची संधी

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..