IPL 2018- तमन्ना भाटियाच्या ‘पिंगा’चा वानखेडेवर दंगा

मुंबई  | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होणार आहे. एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे. 

शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभ सुरू आहे. बाॅलीवूड अभिनेता ह्रितीक रोशनच्या अफलातून परफाॅर्मन्सनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने मराठी गाणे पिंगावर जबरदस्त नृत्य केले. 

तिच्या या नृत्यावर वानखेडेवर आलेल्या क्रिकेटप्रेमींनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. 

यावेळी गायक मिका सिंगनेही बाॅलीवूडची काही प्रसिद्ध गाणी गात चाहत्यांना खुश केले.