तमिल थलाइवाजने केला आपला प्रो-कबड्डीच्या ५ व्या मोसमाचा शेवट गोड !

प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमाच्या शेवटचा लेग खेळला जात आहे. या लेगच्या दुसऱ्या दिवशी पटणा पायरेट्स आणितमिल थलाइवाज यांच्यातील सामन्यात तमिल थलाइवाजने पटणा पायरेट्सला ४०-३७ अश्या मोठ्या फरकाने हरवले.तमिल थलाइवाज हा या मोसमात प्ले-ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे तर पटणा पायरेट्स आणि बंगाल वोरीयर्स यांच्यात झोन बी मध्ये पहिल्या स्थानासाठी चुरशीची लढत चालू आहे.

अजय ठाकूरने पहिल्या सत्रात संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली तर प्रदीप पहिल्याच रेडमध्ये बाद झाला. पटणाला सामन्यातील पहिला गुण चौथ्या मिनिटात मिळाला. पण कमकुवत डिफेन्समुळे पटना ६व्या मिनिटाला सर्वबाद झाली. तेव्हा सामन्याची स्थिती तामिल ९ आणि पटणा २ अशी होती.

९व्या मिनिटाला प्रदीपने पटणाला सामन्यात परत आणण्याचा प्रयन्त चालू केला. पण अजय ठाकूरने तमिलसाठी नियमित कालांतराने गुण मिळवले आणि पटणाला १५व्या मिनिटाला पुन्हा सर्वबाद केले. सामन्याची स्थिती तेव्हा तमिल २५ आणि पटणा ११ अशी होती.

पटणाच्या डिफेन्सची कामगिरी बघून प्रशिक्षकांनी सचिन शिंगाडे आणि विशाल मानेला बदली केले. २४ व्या मिनिटाला अजय ठाकूरला सुपर टॅकल करून पटणाच्या संघाने सामन्यातील पहिला सुपर टॅकल गुण कमवला. या सुपर टॅकलमुळे प्रदीप मॅटवर आला आणि त्याने सामन्याचे रूप बदलले. त्याने २४ व्या मिनिटाला आपला सुपर १० पूर्ण केला. त्यामुळे तमील थलाइवाज ३२ व्या मिनिटाला सर्वबाद झाले. पण त्यानंतर तमील थलाइवाजच्या संघाने डिफेन्समध्ये उत्तम खेळ करत सामना आपल्याकडे झुकवला.

सामन्यात अजय ठाकूर आणि के प्रपंजन यांनी तमीलकडून सुपर १० लगावले तर पटणाकडून प्रदीप नरवालने २० गुण मिळवले.