प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात विजय मिळवण्यासाठी हा संघ करतोय कसून सराव

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात चांगली कामगिरी करता यावी यासाठी तमिल थलाईवाज संघाने आपले सराव शिबीर सुरू केले आहे.

श्री रामचंद्र मेडीकल काॅलेजच्या सेंटर आॅप स्पोर्ट्स सायन्सच्या मैदानावर सुरू आहे. या मैदानावर यापुर्वी केवळ क्रिकेट संघाची सराव शिबीरे झाली आहेत. कबड्डी संघाचे सराव शिबीर येथे होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक इ भास्करन यांनी येथील सोय-सुविधांबद्दल आनंद व्यक्त आहे. तसेच येथे खेळताना अतिशय वैज्ञानिक पद्धतीने लक्ष दिले जाते, असेही ते म्हटले.

या ठिकाणी अनेक वेळा तमिळनाडू रणजी संघाचे सराव शिबीर होत असते. तसेच राज्य संघटनेच्या विविध वयोगटाची सराव शिबीर आयोजीत केली जातात.

या ठिकाणी स्विमींग पूल, फूटबाॅल मैदान, सरावसाठी मैदान, जीम अशा सुविधा उपलब्ध आहेत. तसेच दुखापत झाल्यावर येथे लगेच उपचार केले जातात.

अशा या ठिकाणी सध्या गेल्या हंगामात शेवटच्या स्थानी राहिलेल्या तमिल संघाचे सराव शिबीर सुरू आहे.

हे शिबीर दोन सत्रात ४० दिवस चालू राहणार आहे. त्यातील पहिल्या सत्रात खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष दिले जाणार आहे तर दुसऱ्या सत्रात खेळ, त्यातील योजनांवर काम केले जाणार आहे.

एवढ्या लवकर सराव शिबीर सुरू असल्यामुळे या संघाकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी

बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता