मणिंदर सिंगच्या सुपर १०च्या जोरावर बंगाल वॉरीअर्सचा तामिल थालयवाजवर विजय !

प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमाच्या शेवटच्या लेगला आज पुण्यामध्ये सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सामन्यात बंगालच्या मणिंदर सिंगने सुपर १० करत बंगाल संघाला विजय मिळवून दिला. बंगालचा कर्णधार सुरजीत सिंगनेही या सामन्यात हायफाय करून संघाच्या विजयात सिहाचा वाटा उचलला.

पहिल्या सत्रापासूनच बंगालने सामन्यात आपला दबदबा राखला होता. रेड गुणांमध्ये जरी दोनीही संघ जवळ जवळ बरोबरीत होते पण डिफेन्समध्ये बंगालचे गुण तामिळपेक्षा जास्त होते. बंगालकडून स्टार रेडर मणिंदर सिंग १२ गुण मिळवले तर कर्णधार सुरजीत सिंगने ६ गुण मिळवले. बंगालचा दुसरा रेडर भूपेंदर सिंगनेही चांगली कामगिरी करत ४ गुण मिळवले.

तामिळकडून के प्रपंजनने चांगली कामगिरी करत सुपर १० लगावला. कर्णधार अजय ठाकूरनेही सामन्यात १४ गुण मिळवले. पण तामिळला डिफेन्समध्ये म्हणावं तस यश मिळाले नाही. तामिलचा स्टार डिफेंडर अमित हुडाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने सामन्यात फक्त ३ गुण मिळवले.

हा सामना जिंकून बंगाल झोन बीमध्ये पहिल्या स्थानी येण्यासाठी प्रबळ दावेदार बनले आहेत. या स्थानासाठी पाटण पायरेट्सही शर्यतीत आहेत.