विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ

मंगळवारी (16 एप्रिल) बांगलादेशने 2019 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहिर केला. या संघात अनुभवी तस्किन अहमदला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला विश्वचषकासाठी संघ जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याचे आश्रू लपवता आले नाही.

बांगलादेश क्रिकेटमध्ये असे दुसऱ्यांदा झाले आहे की विश्वचषकासाठी संघात संधी न मिळाल्याने खेळाडूला अश्रू आवरता आलेले नाही. याआधी 2015 च्या विश्वचषकासाठी संघात संधी मिळाली नसल्याने मश्रफे मोर्तझाला रडू कोसळले होते. पण विशेष म्हणजे आता मोर्तझा बांगलादेश संघाचा 2019 विश्वचषकासाठी कर्णधार आहे.

तस्किन अहमदने बांगलादेशकडून 32 वनडे सामने खेळले असून 45 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने शेवटचा वनडे सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 ऑक्टोबर 2017 ला खेळला आहे. त्यानंतर तो सातत्याने दुखापतींचा सामना करत आहे. त्याला न्यूझीलंड दौऱ्यालाही घोट्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागले होते.

त्याच्याऐवजी न्यूझीलंड विरुद्ध कसोटीमध्ये अबू जायेदने चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. त्याचमुळे जायेदला एकही आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला नसला तरी त्याला विश्वचषकासाठी 15 जणांच्या बांगलादेश संघात संधी मिळाली आहे.

तस्कीनने यावर्षी बांगलादेश प्रीमीयर लीगमधून दुखापतीनंतर पुनरागमन केले होते. त्याने या स्पर्धेत 12 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याला एका सामन्यात झेल घेताना पुन्हा दुखापत झाली होती.

2019 विश्वचषकासाठी बांगलादेश संघात संधी न मिळाल्याने भावूक झालेल्या तस्किन अहमदचा व्हिडिओ बांगलादेशमधील BDCricTime  या वेबसाईटने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

2019 विश्वचषकासाठी असा आहे बांगलादेश संघ – 

मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन (उपकर्णधार), मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी

२०१९ विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जोफ्रा आर्चरला संधी नाही

राजस्थान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आर अश्विनने केला भांगडा, पहा व्हिडिओ