रॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत, सेहवागवर पुन्हा एकदा पलटवार!

0 403

आज रॉस टेलरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो एका बंद दुकानाजवळ बसला आहे आणि त्या दुकानाचे नाव एस एस टेलर असे आहे.

काही दिवसांपूर्वीच टेलरच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवाग आणि टेलरमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली होती.ज्यात सेहवागने गमतीशीर ट्विट केले होते ज्यावर टेलरने त्याला हिंदीत प्रतिउत्तर दिले होते.

याच प्रकरणावरून आज टेलरने पोस्ट केलेल्या त्याच्या पोस्टमध्ये हिंदीत लिहिले आहे की ” सेहवाग राजकोटमध्ये सामन्यानंतर दर्जी टेलरचे दुकान बंद आहे. पुढची शिलाई तिरुअनंतपुरम मध्ये होईल. तू जरूर ये.”

 

यामुळे सध्या रॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता यावर सोशल मीडियावर हटके उत्तरे देण्यासाठी प्रसिद्ध असणारा सेहवाग काय म्हणतो याची चाहते वाट बघत आहेत.

अशी झाली होती याची सुरुवात-

काल न्यूझीलंड संघाने भारतीय संघाविरुद्ध दुसरा टी २० सामना ४० धावांनी जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आता तिसरा निर्णायक सामना ७ नोव्हेंबरला तिरुअनंतपुरम इथे होणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: