टी-20 विश्वचषकापुर्वी इंग्लंडला मोठा धक्का, सारा टेलर संघातून बाहेर

महिलांंची टी-20 विश्वचषक स्पर्धा  विंडिजमध्ये 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी इंग्लडच्या महिला संघाला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लडची विकेटकिपर सारा टेलर या विश्वचषक स्पर्धेत खेळणार नसून, मानसिक ताणतणावामुळे तीने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिच्या या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचे ईसीबीने म्हटले आहे.

2016 मध्ये तिने विश्रांती घेतली होती. त्यानंतर 2017 विश्वचषक स्पर्धेत तिने  इंग्लडच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता.

उन्हाळा संपल्यापासून ती इतर खेळाडूं प्रमाणे सराव करू शकली नाही. मानसिक दृष्ट्या ती तितकशी फिट नसल्याचे इंग्लडच्या महिला संघाचे प्रशिक्षक मार्क रॉबिनसन यांनी सांगितले.

तिची स्थिती सध्या प्रशिक्षण, प्रवास करण्यासाठी योग्य नसून तिला बरे होण्यास वेळ लागेल असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

9 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी इंग्लडच्या महिला संघाची निवड पुढच्या आठवड्यात होणार आहे. इंग्लडचा महिला संघ आपला पहिला सामना श्रीलंकेसोबत 10 नोव्हेंबरला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

विंडिज विरुद्ध कोहलीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; काय आहे कारण जाणून घ्या

कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो

-विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शिखर धवनला डच्चू?