5व्या एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत टीसीएस, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा विजय

पुणे। सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत टीसीएस संघाने वाईन एन्टरप्रायझेस संघाचा तर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत राहुल गर्गच्या नाबाद अर्धशतकी केळीच्या जोरावर टीसीएस संघाने वाईन एन्टरप्रायझेस संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना वाईन एन्टरप्रायझेस संघाने 20 षटकात 5 बाद 154 धावा केल्या. यात अजिंक्य नाईकने 59 तर आशिष सुर्यवंशीने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 154 धावांचे लक्ष टीसीएस संघाने 19 षटकात 4 बाद 155 धावा करून पुर्ण केले. यात मयंक जासोरेने 36 व गौरव भालेरावने 33 धावा करून गौरवला सुरेख साथ देत संघाला विजय मिळवून दिला. 35 चेंडूत नाबाद 58 धावा करणारा राहुल गर्ग सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत अभिजीत जगतापच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अभिजीत जगताप, अमित कदम व ओमकार पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे किर्लोस्कर ब्रदर्स संघ केवळ 13.3 षटकात सर्वबाद 71 धावांत गारद झाला. 71 धावांचे लक्ष विराज काकडेच्या, अजित गव्हाणेच्या नाबाद 17 व सिध्देश वारघंटेच्या नाबाद 14 धावांसह सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने केवळ 9.2 षटकात 3 बाद 72 धावा करून सहज पुर्ण केले. 8 धावांत 4 गडी बाद करणारा अभिजीत जगताप सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
वाईन एन्टरप्रायझेस- 20 षटकात 5 बाद 154 धावा(अजिंक्य नाईक 59(51), आशिष सुर्यवंशी 44(32), अनिकेत पोरवाल नाबाद 24(18), अभिनव कालिया 2-27, मयंक जासोरे 1-28, गौरव सिंग 1-32) पराभूत वि टीसीएस- 19 षटकात 4 बाद 155 धावा(राहुल गर्ग नाबाद 58(35), मयंक जासोरे 36(26), गौरव भालेराव 33(27), गौरव सिंग 26(21), धनराज परदेशी 2-18, आशिष सुर्यवंशी 2-43) सामनावीर- राहुल गर्ग
टीसीएस संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.

किर्लोस्कर ब्रदर्स- 13.3 षटकात सर्वबाद 71 धावा(संतोष दिघे 19(13), यतिन कावणकर 17(24), अभिजीत जगताप 4-8, अमित कदम 2-8, ओमकार पाटील 2-15, सिध्देश वारघंटे 1-17) पराभूत वि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 9.2 षटकात 3 बाद 72 धावा(विराज काकडे 20(17), अजित गव्हाणे नाबाद 17(12), सिध्देश वारघंटे नाबाद 14(13), संतोष दिघे 3-22) सामनावीर- अभिजीत जगताप
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.