वन-डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या मोठ्या खेळाडूला वगळले

मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून दिनेश कार्तिकला वगळण्यात अाले असुन रिषभ पंतला या संघात संधी देण्यात आली आहे.

४ वन-डे आणि ४ टी२० सामने खेळलेल्या रिषभ पंतकडे २०१९च्या विश्वचषकासाठी बॅकअप यष्टीरक्षक  म्हणुन पाहिले जात आहे. त्यामुळे त्याला या मालिकेत संधी देण्यात आली आहे.

हार्दिक पंड्या, केदार जाधव, अक्षर पटेल यांना दुखापतीमुळे या मालिकेत घेण्यात आले नाही. तर सिद्धार्थ कौल, दिनेश कार्तिक, दिपक चहर यांना वगळण्यात आले आहे.

भुवनेश्वर कुमार तसेच जसप्रीत बुमराहचेही नाव या संघात नाही. रविंद्र जडेजावर मात्र संघ व्यवस्थापनाने विश्वास कायम ठेवला आहे.

टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, मनिष पांडे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रिषभ पंत, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दुल ठाकूर, केएल राहुल

महत्वाच्या बातम्या-