टीम इंडियासाठी ही आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी…

भारतीय संघ सध्या इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत. या स्पर्धेदरम्यान भारतीय संघ वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे. भारताने इंग्लंडला मागे टाकत हे अव्वल स्थान पटकावले आहे.

या विश्वचषकात भारतीय संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली असून त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या त्यांच्या 5 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

हा विश्वचषक सुरु होण्यासाठी भारतीय संघ वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर इंग्लंड अव्वल क्रमांकावर होता. तसेच या विश्वचषकासाठी इंग्लंड आणि भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.

परंतू या विश्वचषकात भारतीय संघाची जरी कामगिरी चांगली झाली असली तरी मात्र इंग्लंडला या स्पर्धेत संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंडला आत्तापर्यंत या स्पर्धेत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे त्यांना वनडे क्रमवारीतील अव्वल क्रमांकही गमवावा लागला आहे. ते मे 2018 पासून आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होते.

नवीन वनडे क्रमवारीनुसार भारतीय संघ 123 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर 122 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड, चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे.

भारतीय संघ वनडे क्रमवारीबरोबरच कसोटी क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ठरलं! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल तेव्हा करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

पीटरसनने केलेल्या त्या टीकेवर मॉर्गनने दिले असे उत्तर, पहा व्हिडिओ

२७ वर्षांनंतर न्यूझीलंड-पाकिस्तानच्या या दोन खेळांडूबाबत घडला अनोखा योगायोग