भारतीय क्रिकेट संघाचे पुण्यात आगमन !!

पुणे। भारतीय संघाची सध्या न्यूजीलँड विरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील दुसरा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियम, गहुंजेवर खेळवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचे पुण्यात आगमन झाले आहे.

ट्विटरवर भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने पुण्यात आल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोत चहल, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि मनीष पांडे आहेत.

भारताने काल मुंबईला झालेल्या पहिल्या वनडेत ६ विकेट्सने पराभव स्वीकारला होता. परंतु या सामन्यात विराट कोहलीचे शतक मात्र चाहत्यांना आनंद देऊन गेले.

याआधी भारतीय संघ पुण्याच्या मैदानात २ वनडे  सामने खेळाला आहे त्यातील १ इंग्लंड विरुद्ध तर १ ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली आहे. यात भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर इंग्लंड विरुद्ध विजय मिळवला होता.

पुणे शहरात गेले काही आठवडे पाऊस पडत आहे. दिवाळीला विश्रांती घेतल्यावर काल शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली. ह्या सामन्याच्या वेळी पाऊस पडू नये अशीच अपेक्षा चाहते करत असणार आहे.