भारतीय संघाचं इंदोरला आगमन, ऑस्ट्रेलियन संघाचे आज पहिले सराव सत्र

इंदोर । पहिल्या दोन वनडे सामन्यात मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघ काल इंदोर शहरात दाखल झाला. मध्यप्रदेश क्रिकेट असोशिएशनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे सामना येथे उद्या अर्थात २४ सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी गेले दोन आठवडे येथे पाऊस पडत आहे. हा सलग तिसरा सामना आहे ज्यात भारतीय संघाची पावसाने साथ सोडली नाही. सीमारेषेजवळ काही जागी मैदानावर बरेच छोटे पॅच असल्याचं बोललं जात आहे. जवळजवळ ३० क्युरेटर आणि ५० मैदान कर्मचारी मैदान सामन्यासाठी तयार होण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

https://twitter.com/SkymetWeather/status/911217276623273985

आज ऑस्ट्रेलियन संघाचे सकाळी अधिकृत सराव सत्र येथे होणार आहे. ज्याची काही छायाचित्र ऑस्ट्रेलियन पत्रकार मार्टिन स्मिथने प्रसिद्ध केली आहेत.

यदाकदाचित आपणास माहित नसेल तर

# तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

# याच मैदानावर वीरेंद्र सेहवागने २०११ साली विंडीज विरुद्ध २१९ धावा केल्या होत्या.

# या मैदानावर अंदाजे ३०,००० प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

# या मैदानावर आजपर्यंत एकूण ४ वनडे सामने तर एक कसोटी सामना झाला आहे.