भारतीय संघाचे राजकोटमध्ये आगमन, परंतु जडेजा खेळतोय रणजी सामना

राजकोट । भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यासाठी काल भारतीय संघाचे राजकोट येथे आगमन झाले. येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर हा सामना ४ नोव्हेंबर अर्थात उद्या ७ वाजता होणार आहे.

भारतीय संघाचे येथे आगमन झाल्याचे फोटो यावेळी बीसीसीआयच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आले आहे. यात बडोद्याकडून खेळणाऱ्या हार्दिक पंड्या आणि गुजरातकडून खेळणाऱ्या अक्षर पटेल यांचे हार घातलेले फोटो शेअर करण्यात आले आहे.

आज सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेला गुज्जू बॉय अक्षर पटेल सामोरे गेला. त्याने मुख्य करून हिंदीत संवाद साधला.

सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनने ह्या सामन्याचा तब्बल ५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे. या मैदानाची २८००० प्रेक्षकांची क्षमता आहे. तसेच येथील सर्व तयारी पूर्ण झाल्याचे एससीएचे माध्यम प्रमुख हिमांशू शाह म्हणाले.

Namastey 🙏 from Rajkot

A post shared by Team India (@indiancricketteam) on

दोन्ही संघाचे वेगवगेळ्या विमानाने येथे आगमन झाले. न्यूजीलँड संघाने आज सकाळी येथे सराव केला तर आज दुपारी भारतीय संघ येथे सराव करेल.

राजकोटचा लोकल बॉय म्हणून ओळखला जाणारा रवींद्र जडेजा मात्र भारतीय संघात नसल्यामुळे याच शहरात असलेल्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर तो सौराष्ट्र विरुद्ध झारखंड रणजी सामना खेळत आहे.