भारतीय संघ शेवटच्या वनडेसाठी कानपुरात दाखल

कानपुर । भारत विरुद्ध न्यूजीलँड तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाचे काल येथे आगमन झाले. भारतीय संघातील खेळाडूंनी याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पुण्यातील दुसऱ्या वनडेत विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता कानपुरात होणारा तिसरा वनडे जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी संघ उत्सुक आहे.

कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन या खेळाडूंना कानपुरातील फोटो शेअर केले आहेत.

भारतीय संघ १९८६ सालापासून या मैदानावर १३ सामने खेळला असून त्यातील ९ सामने संघ जिंकला आहे. न्यूजीलँड संघाचा या मैदानावरील तिसरा वनडे सामना पहिला सामना असेल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या मैदानावर ८ सामन्यात सार्वधिक अर्थात ३४२ धावा केल्या आहेत तर सध्याच्या संघातील रोहित शर्मा या खेळाडूने ३ सामन्यात १८२ धावा केल्या आहेत.

गोलंदाजीत जवागल श्रीनाथने ४ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. हा सामना रविवारी अर्थात २९ ऑक्टोबरला होणार आहे.