भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ

सेन्चुरियन वनडेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारत या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी २३ वर्षीय एडिन मार्करम हा खेळाडूला आला होता.

भारतीय संघात या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आला नाही.

असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल