भारतीय कबड्डी संघ एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी इराणला रवाना

0 1,217

दिल्ली । गोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ आज सकाळी मार्गस्थ झाला. दिल्ली येथून विमानाने संघ तेहरान येथे गेला आहे. 

भारतीय संघ येथे २४ ते २६ नोव्हेंबर या काळात स्पर्धेत भाग घेईल. यावेळी संघातील राहुल चौधरी याने फेसबुकवर संघाची काही छायाचित्र शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राहुल म्हणतो, ” आम्ही प्रो कबड्डीमध्ये जरी वेगवेगळ्या संघातून खेळत असलो तरी देशासाठी पुन्हा एक झालो आहोत. आम्ही एशियन कबड्डी चॅम्पियनशिपला जाण्यासाठी तय्यार झालो आहोत. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. ” 

राहुल चौधरी प्रमाणेच बेंगळुरू बुल्स संघाचा कर्णधार रोहित कुमार म्हणतो, ” देशासाठी खेळायला मिळणार असल्यामुळे खूप उत्साहित झालो आहे. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. ”  

कर्णधार अजय ठाकूरने एक खास विडिओ ट्विटरवर शेअर करत माझी पुतणी मला एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी शुभेच्छा देत असल्याचं म्हटलं आहे. 

Comments
Loading...
%d bloggers like this: