अशी आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया, रहाणेकडे संघाचे नेतृत्व

मुंबई | भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी मालिकेसाठी आज बीसीसीआयने टीम  इंडियाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारतीय कर्णधारपदाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली आहे.

कर्णधार म्हणुन हा रहाणेचा दुसराच कसोटी सामना आहे. यापुर्वी त्याने आॅस्ट्रलियाविरुद्ध धरमशाला कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते.

Read- १० पैकी ८ मॅच जिंकणारी हैद्राबादही होऊ शकते आयपीएलमधून बाहेर

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना १४ ते १८ जूनला बेंगलोर येथे खेळणार आहे.

अशी आहे टीम इंडिया- अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दल ठाकुर

Read- भाऊ! टीम इंडियाला कसोटी मालिकेत त्रास नाही द्यायचा!