आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद

मुंबई |आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली असुन रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

सलामीवीर शिखर धवन संघाचा उपकर्णधार असणार आहे. अंबाती रायडू, केदार जाधव, मनीष पांडे यांनी संघात पुनरागमन केले आहे.

मुंबईला बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली.

ही स्पर्धा युएईमध्ये १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात होणार आहे.

या स्पर्धेसाठी टीम इंडिया अ गटात समावेश करण्यात आलेला असून भारतासमावेत पाकिस्तानही या गटात असणार आहे. तिसरा संघ हा पात्रता फेरीतीन निकालानंतर ठरेल. सध्या या शर्यतीत संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हॉंगकॉंग आहेत.

ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे.

असा आहे आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरश्रक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

 बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

 याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

 वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

 टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…