इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया

मुंबई | भारत विरुद्ध इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी आज बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारतीय कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीकडे कायम करण्यात आली आहे.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामने, ३ वनडे सामने आणि ५ कसोटी सामने खेळणार आहेत. यातील वनडे आणि टी२० साठी आज संघ निवड झाली.

१२ जुलै ते १७ जुलै २०१८ या काळात ही वनडे मालिका होणार आहे. विराट कोहलीने श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्राॅफी वेळी विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ फेब्रुवारीनंतर प्रथमच खेळणार आहे.

अशी आहे टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वाॅशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव