इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई | भारत विरुद्ध आयर्लंड आणि  भारत विरुद्ध आयर्लंड इंग्लंड टी२० मालिकेसाठी आज बीसीसीआयने टीम  इंडियाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारतीय कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीकडे कायम करण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धची टी२० मालिका ०३ जुलै ते ०८ जुलै २०१८ या काळात होणार आहे. त्यापुर्वी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन टी२० सामन्यांतील पहिला २७ जून तर दुसरा सामना २९ जून रोजी होणार आहे.

विराट कोहलीने श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्राॅफी वेळी विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर प्रथमच खेळणार आहे.

अशी आहे टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिश पांडे, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, वाॅशिगंटन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, सिद्धार्थ कौल