मोठी बातमी – २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई। 30 मे पासून सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी आज 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून उपकर्णधार रोहित शर्मा असणार आहे.

तसेच विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या या 15 जणांच्या भारतीय संघात एमएस धोनीसह दिनेश कार्तिकला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिखर धवन आणि विजय शंकरचीही या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

या भारतीय संघात अष्टपैलू म्हणून केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा यांना संधी मिळाली आहे.

फिरकी गोलंदाजामध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांच्या फळीत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांना संधी मिळाली आहे.

भारताचा  2019 विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याआधी भारतीय संघ 25 मे ला न्यूझीलंड विरुद्ध ओव्हल मैदानावर तर 28 मे ला बांगलादेश विरुद्ध कार्डिफ वेल्स स्टेडियमवर सराव सामने खेळणार आहे.

असा आहे 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार ), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर,रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या – 

दोन मोठ्या खेळाडूंना वगळले, विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

धोनीवर २-३ सामन्यांची बंदी हवी होती, भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूचे परखड मत…