सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

सिडनी | चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. १३ सदस्यीय संघात केएल राहुल, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

अश्विनच्या चौथ्या कसोटीतील सहभागाबद्दल सामना होण्यापुर्वी निर्णय घेण्यात येणार आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघात मोठी संधी मिळालेला रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतला आहे. रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही.

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याच कसोटी रोहितने ६३ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला होता.

सिडनी कसोटीत भारतीय संघ विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यामुळे रोहितच्या जागी आता केएल राहुल, आर अश्विन आणि कुलदीप यादवपैकी संघव्यवस्थापन कुणाला संधी देते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

असा आहे १३ सदस्यांचा भारतीय संघ- 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या:

वडीलांच्या निधनानंतरही तो खेळाडू खेळत होता संघासाठी…

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २०१८ वनडे संघाचा विराट कोहली झाला कर्णधार

नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर