असा आहे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

जोहान्सबर्ग । आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

हा सामना ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना असणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे भारताला या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या दोनही सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती परंतु फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली होती.

भारतीय संघाला या दोन्ही सामन्यात विजयाची संधी होती मात्र मोक्याच्या वेळेला फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्याने पराभव स्वीकारावा लागला होता.

असा आहे भारतीय संघ: मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार),हार्दिक पंड्या, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी