Album: वनडे मालिकेसाठी भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ६ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आज भारतीय संघातील काही खेळाडूंनी दुबई मार्गे जोहान्सबर्गला प्रस्थान केले.

कसोटी मालिका संपल्यावर भारतीय संघ लगेच वनडे मालिकेत सहभागी होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू २४ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होते.

जे खेळाडू आज रवाना झाले त्यात एमएस धोनी, अक्षर पटेल आणि युझवेन्द्र चहल हे खेळाडू होते. तसेच याच विमानात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जोन्टी रोड्सची मुलंही होती.

कसोटी मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंपैकी ज्यांची निवड वनडे संघात झाली आहे त्यांच्याबरोबर एमएस धोनी, युजवेंद्र चहल, श्रेयर अय्यर, केदार जाधव, कुलदीप यादव, मनीष पांडे आणि अक्षर पटेल हे खेळाडू सामील होणार आहे.