- Advertisement -

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ डांबूला येथे दाखल !!!

0 61

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचं आज डांबूला येथे आगमन झालं. यावेळी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंटवरून संघातील खेळाडूंची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

यावेळी कर्णधार विराट कोहली, माजी कॅप्टन कूल एमएस धोनी, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचे येथील हॉटेलमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी एमएस धोनी लाल रंगाच्या टीशर्ट मध्ये तर अन्य खेळाडू हे भारतीय संघाच्या अधिकृत लोगो असणाऱ्या टीशर्ट वर दिसले.

पहिला एकदिवसीय सामना श्रीलंकेतील येथे २० ऑगस्ट रोजी तर शेवटचा सामना कोलंबो येथे होणार आहे.

एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:

२० ऑगस्ट – पहिली वनडे डम्बुला

२४ ऑगस्ट – दुसरी वनडे कँडी

२७ ऑगस्ट – तिसरी वनड कँडी

३१ ऑगस्ट – चौथी वनडे कोलंबो

३ सप्टेंबर – पाचवी वनडे कोलंबो

Comments
Loading...
%d bloggers like this: