दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध ठेवले २०८ धावांचे लक्ष

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १३० धावात गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ७७ धावांची आघाडी घेतली होती त्यामुळे भारतासमोर आता हा सामना जिंकण्यासाठी २०८ धावांचे लक्ष्य आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना या डावात विशेष काही करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर एडेन मार्कर्म(३४) आणि डीन एल्गार(२५) यांनी सुरवातीला ५२ धावांची सलामी भागीदारी रचली होती परंतु त्यांना ही भागीदारी वाढवता अली नाही.

त्यांच्यानंतर एबी डिव्हिलियर्स(३५) आणि केशव महाराज(१५) या दोंघाशिवाय बाकी एकही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही गाठता अली नाही. त्यामुळे त्यांचा हा डाव १३० धावातच संपुष्टात आला.

भारताकडून जसप्रीत बुमराह(३/३९), मोहम्मद शमी(३/२८), भुवनेश्वर कुमार(२/३३) आणि हार्दिक पंड्या(२/२७) यांनी बळी घेतले.