खेळाडूंचा फिटनेस सांभाळणाऱ्या पॅट्रिक फऱ्हाट यांचा टीम इंडियाला अलविदा

2019 विश्वचकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताला काल(10 जूलै) न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवाबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

या पराभवानंतर भारतीय संघाचे फिजीओथेरपिस्ट पॅट्रिक फऱ्हाट यांचा बीसीसीआयबरोबरचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे त्यांचा काल भारतीय संघाबरोबर शेवटचा दिवस होता. याबरोबरच भारताचे फिटनेस प्रशिक्षक शंकर बासू यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काही रिपोर्ट्स नुसार फऱ्हाट आणि बासू यांनी विश्वचषकानंतर ते त्यांचे पद सोडणार असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. बीसीसीआयने त्यांना त्यांच्या कराराचे नुतनीकरण करण्याची ऑफर दिली होती. परंतू त्यांनी त्याला नकार दिला आहे.

टीम इंडियाचा निरोप घेताना फऱ्हाट यांनी भावनिक ट्विट केले आहे. 2015 पासून टीम इंडियाबरोबर असणाऱ्या फऱ्हाट यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘भारतीय संघाबरोबर माझा हा शेवटचा दिवस होता. पण माझा शेवटचा दिवस मला हवा होता तसा झाला नाही. मी बीसीसीआयचे आभार मानतो, त्यांनी मला 4 वर्षे संघाबरोबर काम करण्याची संधी दिली. भविष्यकाळासाठी खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला माझ्या शुभेच्छा.’

फऱ्हाट यांच्याबरोबरच बासू यांनीही भारतीय संघाच्या फिटनेससाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यांनीच भारतीय क्रिकेटपटूंसाठी योयो टेस्ट अनिवार्य केली होती.

बासू आणि फऱ्हाट यांचे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी आभार मानले आहेत.

विराटने म्हटले आहे की ‘पॅट्रिक आणि बासू तूम्ही संघाबरोबर केलेल्या शानदार कामाबद्दल तूमचे आभार. महत्त्वाचे म्हणजे तूमची आमच्या सर्वांबरोबर असणारी मैत्री सर्वात खास आहे. तूम्ही दोघेही खरे सज्जन व्यक्ती आहात. तूम्हाला तूमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

लता मंगेशकरांची धोनीला मोठी विनंती, ‘धोनी, असे करु नको’

धोनीच्या निवृत्तीबद्दल कर्णधार विराट कोहलीने केले मोठे भाष्य

व्हिडिओ: विलियम्सन म्हणतो, ‘…तर धोनीची न्यूझीलंडच्या संघात निवड करु’