पहिल्या वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया, ३ महाराष्ट्रीयन खेळाडूंना मिळाली संधी

डर्बन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ६ सामन्यांच्या वनडेत मालिकेत पहिला सामना आज होत आहे. हा सामना किंग्समेड डर्बन येथे होत आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेविरुद्ध १७ डिसेंबर रोजी झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यातील बहुतेक खेळाडूंना या सामन्यात संधी देण्यात आली आहे.अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि रोहित शर्मा हे महाराष्ट्र आणि मुंबई रणजी संघातील खेळाडूही संघात आहे.

असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल