सेमीफायनलमध्ये हरल्यानंतरही टीम इंडियाला मिळणार कोट्यावधी रुपये

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेली 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या(14 जूलै) होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले होते. त्यातील भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.

त्यानंतर मात्र उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले असले तरी मात्र भारतीय संघाला आयसीसीकडून 7,55,28,750 कोटी रुपये बक्षिस रक्कम मिळणार आहे. आयसीसीच्या बक्षिस रकमेच्या रचनेनुसार विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 27,46, 50,000 रुपये मिळणार आहे. क्रिकेट स्पर्धेत मिळणारी ही सर्वात मोठी बक्षिस रक्कम आहे.

याबरोबर आयसीसी प्रत्येक संघाला साखळी फेरीतील विजयासाठीही 27,46,500 रुपये बक्षिस रक्कम देणार आहे.

आयसीसीच्या बक्षिस रक्कमेच्या रचनेनुसार भारताला उपांत्य सामन्यातील पराभूत संघ म्हणून 5,49,30,000 रुपये मिळणार आहेत. तसेच साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी 27,46,500 रुपये मिळणार आहेत. तर पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यासाठी 13,73,250 रुपये मिळणार आहेत.

त्यामुळे भारताला साखळी फेरीत मिळवलेल्या 7 विजयांचे आणि एक रद्द झालेल्या सामन्याचे मिळून बक्षिस रक्कम म्हणून एकूण 2,05,98,750 रुपये मिळणार आहेत. असे मिळून भारतीय संघाला 7,55,28,750 रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे.

अशी आहे आयसीसीची बक्षिस रक्कमेची रचना –

Screengrab: cricketworldcup.com

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनीला रनआऊट केल्याबद्दल मार्टिन गप्टिल म्हणतो…

एमएस धोनीला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचे रवी शास्त्री सांगितले कारण…

विराट कोहली, युवराज सिंगने एबी डिविलियर्सला असा दिला पाठिंबा