Video: भारतीय संघाने २० वर्षात केला नाही असा केला आज सराव

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ चांगलाच कसून सराव करत आहे. त्यांच्या या सरावाचा व्हिडीओ क्रीडा पत्रकार आनंद वासू यांनी शेयर केला आहे.

यात ते म्हणाले आहेत की “विश्वास बसत नाही की २० वर्षात मी जगभर क्रिकेट कव्हर करताना आजपर्यंत असा सराव सराव पाहिलेला नाही.”

या व्हिडीओ मध्ये भारतीय संघाचे सर्व खेळाडू सराव करताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडीओमध्ये भारतीय संघ फुटबॉल खेळून सराव करताना दिसत आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव स्वीकारला होता. आता भारतीय संघ १३ जानेवारीला दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला बरोबरी करण्याची संधी आहे.