टीम इंडियाची युके दौऱ्यासाठी मंगळवारी होणार घोषणा

मुंबई । आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे.

भारतीय संघ बेंगलोरला १४ ते १८ जून रोजी बेंगलोर येथे कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यातून अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून भारतीय संघ तेथे २ टी२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यात पहिला सामना २७ जून तर दुसरा सामना २९ जून रोजी होणार आहे

त्यामुळे अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी तसेच आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी ही संघ निवड होणार आहे.

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळणार असल्यामुळे जुन महिन्यात तयारीचा एक भाग म्हणुन भारत अ संघ या देशात खेळायला जाणार आहे. तो संघही मंगळवारी घोषीत होणार आहे.

भारत अ संघात कसोटी संघातील ७ खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यात अजिंक्य रहाणे, मुरली विजय, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –