जेव्हा अरिजित – विराट कोहली भेट होते

भारतीय क्रीडा क्षेत्रातील आघाडीचे नाव विराट कोहली आणि भारतीय संगीत क्षेत्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत यांनी आज एकमेकांची भेट घेतली. याचा फोटो विराटने ट्विटरवर शेअर केला आहे.

विराट म्हणतो, ” माझ्यासाठी हा एक चांगला क्षण आहे. अरिजित एक खूप खास व्यक्ती आहे. त्याच्या आवाजात जी जादू आहे त्याने मी मोहून जातो. अशी जादू कुणाकडेच नाही. तुला खूप शुभेच्छा अरिजित. ”

केवळ २० मिनिटात तब्बल ५००० चाहत्यांनी हा फोटो लाइक केला असून त्याला ६०० हुन अधिक रिट्विट आले आहेत तर फेसबुकवर तब्बल ४४ हजार चाहत्यांनी हा फोटो लाइक केला आहे.

सध्या विराट सुट्ट्यांचा आणि दिवाळीचा आनंद घेत आहे. परंतु २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या न्यूजीलँडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट लवकरच संघाबरोबर सराव करताना दिसेल.