दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटऐवजी या खेळाडूला मिळणार संधी?

विश्वचषक स्पर्धा 2019 अवघ्या 9 महिन्यानंवर येवून ठेपली आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळाडू तंदुरूस्त आणि उत्साही रहावेत यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन आपले रोटेशन पाॅलीसीचे धोरण कायम ठेवणार आहे.

संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी काळात आणखी काही वन-डे सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. विंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत  विराट ऐवजी नवोदित मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता आहे.

एशिया कप स्पर्धेतून विराटला विश्रांती देण्यात आली होती. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती. विराटला श्रीलंकेत झालेल्या निदहास ट्राॅफी आणि अफगाणिस्तानविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून देखील विश्रांती देण्यात आली होती.

संघ व्यवस्थापनाच्या या धोरणाचा भाग म्हणून सध्या चालू असलेल्या विंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेत  बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे.

विंडिजविरूद्धच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलियाच्या प्रदिर्घ दौऱ्यावर जाणार आहे. आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 , 4 कसोटी, 3 वन-डे सामने खेळणार आहे.

भारतीय संघ 23 जानेवारी 2018 ते 10 फेब्रुवारी न्युझिलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्युझिलंडमध्ये भारतीय संघ 5 वन-डे सामने आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीसह इतरही महत्वाचे खेळाडू फिट कसे राहतील याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-