रिषभ पंतचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण; पहिल्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया

गुवाहाटी। भारत विरुद्ध विंडीज संघात आजपासून पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताचा 12 जणांचा संघ बीसीसीआयने कालच जाहीर केला असून यात रिषभ पंतला पहिल्यांदाच भारताच्या 12 जणांच्या वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.

तो भारताकडून वनडेत पदार्पण करणारा 224 वा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर भारताच्या संघात अंबाती रायडू आणि उमेश यादवनेही पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव या सामन्यातील 12 वा खेळाडू असेल.

तसेच आजच्या सामन्यातून विंडीज संघाचे ओशाम थॉमस आणि चंद्रपॉल हेमराज हे वनडेत पदार्पण करणार आहेत.

असा आहे भारताचा 11 जणांचा संघ: विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, एमएस धोनी, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, युजवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..

ISL 2018: जमशेदपूरमधील सामन्यात एटीकेची लागणार कसोटी

ISL 2018: दिल्लीच्या विजयाची प्रतिक्षा कायम; केरला विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत