१९वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारताचे राज्य, पृथ्वी शॉची टीम इंडिया नवे विश्वविजेते

भारताने ६ वर्षांनी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात ८ विकेट्सने पराभूत करत हा विश्वचषक जिंकला आहे.

भारताने तब्बल चौथ्यांदा हा विश्वचषक जिंकला असून अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव संघ आहे. या विजयात भारताकडून मनजोत कार्लाने शतकी खेळी आहे तर हरवीक देसाईने त्याला चांगली साथ दिली.

या संघाचे प्रशिक्षपद हे माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी सांभाळले तर मुंबईकर पृथ्वी शॉने या संघाचे नेतृत्व केले. या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय पाठीराखे मैदानावर उपस्थित होते.

या विश्वचषकात सार्वधिक विकेट अनुकूल रॉयने १४ विकेट्स घेतल्या तर फलंदाजीत सर्वाधिक धावा ह्या शुभमन गिलने केल्या.