असे आहे टीम इंडियाचे २०१९ चे संपुर्ण वेळापत्रक

विराट कोहली कर्णधार असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे 2019 हे वर्ष चांगलेच व्यस्त असणार आहे. या वर्षात आयसीसी विश्वचषकही आहे. तसेच भारतीय संघ या वर्षात न्यूझीलंड आणि विंडिज दौरा करणार आहे.

त्याचबरोबर या वर्षात भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिका, विंडीज आणि बांगलादेश विरुद्धही सामने खेळणार आहे.

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांचा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.

असे आहे 2019 चे भारतीय संघाचे संपुर्ण वेळापत्रक – 

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –  चौथा कसोटी सामना – 3-7 जानेवारी

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा – वनडे मालिका – तीन सामने – 12, 15 आणि 18 जानेवारी

भारताचा न्यूझीलंड दौरा –  5 वनडे आणि 3 टी20 सामने – 23 जानेवारी – 10 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – 5 वनडे आणि 2 टी20 सामने – 24 फेब्रुवारी – 13 मार्च

झिम्बाब्वेचा भारत दौरा – 1 कसोटी, 3 वनडे – मार्च

आयपीएल 12 वा मोसम – 29 मार्च – 19 मे

आयसीसी विश्वचषक – 30 मे – 14 जूलै

भारताचा विंडीज दौरा – 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी20 सामने – जूलै-ऑगस्ट

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 3 कसोटी सामने – ऑक्टोबर – नोव्हेंबर

बांगलादेशचा भारत दौरा – 2 कसोटी, 3 टी20 सामने – नोव्हेंबर – डिसेंबर

विंडाजचा भारत दौरा – 3 वनडे, 3 टी20 सामने – डिसेंबर

महत्त्वाच्या बातम्या:

१३ जणांच्या टीम इंडियात निवड झालेला हा खेळाडू सिडनी कसोटीतून बाहेर

स्म्रीती फक्त मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आहे तरबेज!

वडीलांच्या निधनानंतरही तो खेळाडू खेळत होता संघासाठी…