तो आता बॉल बॉय म्हणून दिसणार नाही !

मुंबई । भारतीय संघाच्या कोणत्याही सामन्यात नेहमी बॉल बॉय म्हणून जबाबदारी पार असलेला धरमवीर पाल यापुढे हे काम करताना दिसणार नाही.

बीसीसीआयच्या नवीन नियमांप्रमाणे तो यापुढे असं करताना दिसणार नाही.

जेव्हा धरमवीर भारत विरुद्ध न्यूजीलँड सामन्यावेळी मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर आला तेव्हा त्याला बॉल बॉय’चा पास नाकारण्यात आला. त्याला भारतीय संघातील एका खेळाडूने तिकिट दिल्यामुळे तो सामना पाहू शकला.

२३ वर्षीय धरमवीर पोलिओमुळे लहानपणापासून अपंग आहे. तो भारत ज्या शहरात सामना खेळणार आहे त्या प्रत्येक शहरात बॉल बॉय म्हणून उपस्थित असायचा.

टाइम्स नाऊ या न्यूज चॅनेलशी बोलताना तो म्हणाला, ” मी वानखेडेवर गेलो परंत्तू मला पास मिळणार नाही असे सांगण्यात आले. मला एका भारतीय खेळाडूने तिकिट उपलब्ध करून दिले. मला सामना पाहायला मिळण्याशी संबंध आहे. मग ते सीमारेषेवरून असो किंवा स्टॅन्डमधून. “

“मी वानखेडेवरील अधिकाऱ्यांना विचारले की मला पास का देण्यात आला नाही तर ते म्हणाले बीसीसीआयच्या नव्या नियमाप्रमाणे आम्ही तुला तशी परवानगी देऊ शकत नाही. मला काहीही तक्रार नाही. मला जे काही मिळालं आहे ते फक्त क्रिकेटमुळे मिळालं आहे. मी अनेक वर्षांपासून संघाला पाठिंबा देत आलो आहे आणि यापुढेही देत राहील. “

कोण आहे धरमवीर पाल ?
– भारतीय संघाचा बॉल बॉय म्हणून जबाबदारी पार पडणारा मोठा चाहता

-त्याचा जन्म मध्यप्रदेशमधील मोनेर जिल्ह्यात झाला आहे.

-तो भारतीय संघाचे सामने पाहायला जगभर फिरला आहे.

-त्याचा हा प्रवास १२ वर्षांपूर्वी २००५ साली भारत विरुद्ध श्रीलंका मोहाली वनडेने सुरु झाला.

-अपंगांसाठी आयोजित स्पर्धेत त्याने मध्यप्रदेश संघाचे नेतृत्व केले होते.