या दिवशी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा

भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने सहा अंतिम उमेदवारांची निवड केली आहेत. यामध्ये भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री, माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांनी निवड झाली आहे.

या सहा जणांमधून सल्लागार समीती एकाची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करणार आहे. न्यू इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सल्लागार समीती 16 ऑगस्टला मुंबईत अंतिम सहा उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून त्याच दिवशी एकाची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करणार आहे.

भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे.

भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर संपणार आहे. त्यांच्या करारात 2019 विश्वचषकानंतर 45 दिवसांची वाढ करण्यात आली होती.

त्यामुळे आता सध्या सुरु असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय वरिष्ठ संघासाठी नव्याने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य सपोर्ट स्टाफची नियुक्ती होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीची माफी मागत डेल स्टेनने केली निवड समीतीवर टीका

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची झाली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली