इंद्रायणी संघाने पटकाविला केसरी करंडक

पुणे: केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या फुटबॉलच्या सामन्यात इंद्रायणी संघाने आक्रमक कामगिरी करत केसरी करंडक पटकाविला.

इंद्रायणी संघाने 3-0 असा गोल फरकाने जिंकला. या सामन्यात इंद्रायणी संघाच्या जगतराज याने सामन्याच्या 27 मिनिटाला पहिला गोल केला. तर त्याला साथ देत करमेंद्र सरोज याने सामन्याच्या 62 मिनिटाला दुसरा गोल केला. तर जगतराज याने 68 मिनिटाला तिसरा गोल केला. तर दुसरीकडे गतविजेत्या परशुरामियन्स संघाच्या एकाही फुटबॉलपटूला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना एकतर्फी इंद्रायणी संघाने जिंकला.

इंद्रायणी संघाचा गोलरक्षक प्रियतोष चतुर्वेधी याने शानदार कामगिरी करत तब्बल 6 गोलांचे आक्रमण अडविले. त्यामुळे हा सामना इंद्रायणी संघाच्या बाजुने झुकला. परशुरामियन्स संघाचा गोलरक्षक रोहण फासणे साजेशी कामगिरी करता आली नाही.

या स्पर्धेचा विजेता संघ इंद्रायणी संघाला रोख 21,000 रुपये आणि उपविजेत्या संघाला रोख 11,000 रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

यावेळी बेस्ट फॉरवर्ड म्हणुन इंद्रायणी संघाच्या जगतराज याला गौरविण्यात आले. तर बेस्ट हाफ म्हणुन इंद्रायणी संघाच्या मार्कंड हरदेवला गौरविण्यात आले. तर बेस्ट डिफेन्स म्हणुन परशुरामियन्स संघाचा मयुर लकडेला गौरविले. तर सर्वोत्तम गोलरक्षक म्हणुन प्रियतोष चतुर्वेधी आणि प्लेअर ऑफ द टुर्नांमेट म्हणुन सोहेल शेखला गौरविले. शिस्तबद्ध फुटबॉल संघ म्हणुन सासवड फुटबॉल क्लबला गौरविले.

केसरी करंडकाचा संक्षिप्त निकाल:

इंद्रायणी विरुद्ध परशुरामियन्स अ संघात रंगला सामना

निकाल:  इंद्रायणी संघाने 3-0 असा जिंकला.