सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा दणदणीत विजय

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने जम्मू काश्मीर संघाचा दणदणीत पराभव करत स्पर्धेत चांगली सुरुवात केली.

महाराष्ट्राच्या संघाने जम्मू काश्मीरचा ६८-१३ असा पराभव केला. एकवेळ महाराष्ट्राकडे ३९-५ अशी आघाडी होती यावरूनच महाराष्ट्र या सामन्यात कसा खेळला याचा अंदाज येतो.

कर्णधार रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखाली नितीन मदने, गिरीश इर्नाक, निलेश साळुंके आणि सचिन शिंगाडे या प्रो कबड्डीमधील स्टार खेळाडूंनी आज चांगली कामगिरी केली.

महाराष्ट्राचा पुरुषांचा संघ या स्पर्धेत क गटात असून या गटात गुजरातने १ आणि महाराष्ट्राने १ विजय मिळवला आहे तर जम्मू काश्मीरला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

यामुळे जम्मू काश्मीरच्या स्पर्धेतील बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या जम्मू काश्मीर संघावरील विजयानंतरची क गटाची गुणतालिका
ग्रुप क
महाराष्ट्र:सामने-१, विजय-१, पराभव-०
गुजरात: सामने-१, विजय-१, पराभव-०
जम्मू आणि काश्मीर: सामने-२, विजय-०, पराभव-२