करुन नायर, मुरली विजयला संघातून डच्चू देण्यावरून समोर आला मोठा खुलासा

हैद्राबाद | भारतीय संघ निवड समिती आणि खेळाडूंमध्ये संवादाचा अभाव आहे, अशी टीका विंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत संधी न मिळाल्याने सलामीवीर मुरली विजयने आणि युवा खेळाडू करून नायर यांनी केली होती.

“निवड समिती आणि संघ व्यवस्थापन हे दोन्ही खेळाडूंसोबतच्या संवाद प्रक्रियेत सारखीच भुमिका बजावत असतात. संघ निवडीबाबत आमची योजना एकदम स्पष्ट आहे.” असे मत निवड समितीचे मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद यांनी हैदराबाद येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

या आधी एमकेएस प्रसाद यांनी आपले सहकारी देवांग गांधी यांनी खेळाडूंसोबत चर्चा केल्याचे सांगितले होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

बुधवारी (10 आॅक्टोबर) प्रशासकीय समितीचे मुख्य सदस्य विनोद राय यांनी संघ व्यवस्थापन, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवि शास्त्री, उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा केली .

यापुढे निवड समितीच्या प्रत्येक बैठीकनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्याची ठरवले आहे.

महत्वाच्या बातम्या-